Map Graph

द ब्लिट्झ

द ब्लिट्झ ही जर्मन वायुसेनेने (लुफ्तवाफे) दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४०-४१मध्ये युनायटेड किंग्डमवर केलेल्या बोम्बफेक मोहीम होती. बॅटल ऑफ ब्रिटन या लढाईच्या अंतापासून सुरू झालेल्या या मोहिमेत लुफ्तवाफेने इंग्लंडमधील औद्योगिक वसाहती, शहरे व गावांवर तुफान बॉम्बफेक केली होती. याची सुरुवात लंडनवरील हल्ल्यांनी झाली. बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये मात खाल्लेल्या लुफ्तवाफेने या हल्ल्यांनी रॉयल एर फोर्सच्या विमानांना मोकळ्या मैदानात खेचण्यासाठीचा हा व्यह होता. ६ सप्टेंबर १९४० पासून ५७ पैकी ५६ दिवस लंडनवर बॉम्बफेक झाली.

Read article
चित्र:St_Paul_destroyed.jpg